रिपाईंच्या कार्यकर्त्यांना रामदास आठवलेंनी दिल लक्ष्य

रिपाईंच्या कार्यकर्त्यांना रामदास आठवलेंनी दिल लक्ष्य

मुंबई : मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एक ही उमेदवार निवडून आला नाही. या लाजिरवाण्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी येत्या 2022 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाईचे किमान 25 उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

एम आय जी क्लब येथे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी रिपाईच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रामदास आठवले यांनी मुंबई मनपा निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि रणनीती ठरविण्याबाबत चर्चा केली.

आगामी मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेना; राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्र आव्हान उभे करेल. त्यांच्या विरुद्ध भाजप आणि आरपीआय युती करून लढेल. भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर करण्यासाठी भाजपसोबत आरपीआयचे उमेदवार निवडून आणणे आवश्यक आहे. यासाठी आपापले वॉर्ड निश्चित करुन आतापासून कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी करावी, असे आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत.

COMMENTS