सुमार कामगिरी करणाय्रा राज्यातील 30 आमदारांना भाजप देणार नारळ?

सुमार कामगिरी करणाय्रा राज्यातील 30 आमदारांना भाजप देणार नारळ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत जवळपास 30 आमदारांना तिकीट न देण्याची भूमिका भाजपनं घेतली असल्याची माहिती आहे. गेल्या पाच वर्षात सुमार कामगिरीमुळे 30 आमदारांना नारळ दिलं जाणार असल्याची माहिती आहे. हे तीस आमदार कोण याबाबतची माहिती अजून समजू शकलेली नाही. भाजपनं याबाबत एक अंतर्गत सर्व्हे केला असून या सर्व्हेतून या 30 आमदारांची माहिती घेतली आहे. त्यामुळे हे 30 आमदार कोण याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान मागील निवडणुकीत शिवसेना- भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यामध्ये भाजपनं 122 जागा जिंकल्या होत्या. परंतु आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती ठरली आहे. दोन्ही पक्ष 144 -144 जागा लढवणार आहेत. युतीमुळे आगामी निवडणुकीत भाजप कमी जागा लढवणार आहे. त्यामुळे भाजपकडून सुमार कामगिरी करणाय्रा 30 आमदारांची तिकीट कापलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा यांचा सामावेश आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतही याचं तिरीट कापलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे.

COMMENTS