अर्णब गोस्वामीला अटक, पाहा भाजप, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया!

अर्णब गोस्वामीला अटक, पाहा भाजप, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया!

मुंबई – रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली.कलम ३०६ च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली असल्याची माहिती आहे.   अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी अर्णब गोस्वामी यांना पोलीस पकडून घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावले. अर्णब गोस्वामी म्हणाले की, मला औषधेही घेऊ दिली नाहीत, मला पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचा आरोप अर्णबने केला आहे.

दरम्यान रायगडच्या अलिबाग येथे इंटिरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती, या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मुंबईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला.

अर्णब  व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता.
आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी ४ मे रोजी अन्वय कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. त्यानंतर नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान याप्रकरणी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं भाजप नेते तसेच अभिनेत्री कंगणा राणावतनं म्हटलं आहे.

तर शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपवर टीका केली आहे. केवळ तो एक पत्रकार आहे आणि त्याची भाजप नेत्यांशी जवळीक आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करु नये का? असा सवाल प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

COMMENTS