आणखी एक भाजप खासदार बंडाच्या पवित्र्यात!

आणखी एक भाजप खासदार बंडाच्या पवित्र्यात!

नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम असल्याचं दिसत आहे. परंतु दुस-या बाजुला मात्र भाजपचे काही खासदार आणि काही आमदार मात्र पक्षावर नाराज असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपचे काही आमदारही नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आता दिल्लीचे भाजप खासदारही बंडाच्या पवित्र्यात असून येत्या २६ डिसेंबरला ते सरकारविरोधात यात्रा काढणार आहेत.

भाजपचे खासदार डॉ. उदित राज यांनी सरकारवर जोरदार टीका करत नोकरीतील आरक्षण धोक्यात आल्यामुळे २६ डिसेंबर रोजी ‘संविधान बचाव’ यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे.. त्याशिवाय सुप्रीम कोर्टातील न्यायाधीस दलित विरोधी असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीची पद्धत बदलण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत.सरकारी नोकऱ्या बंद केल्या जात असून आऊट सोर्सिंग सुरु आहे, यामुळे आरक्षण मरत चाललं आहे. एससी, ओबीसी आणि महिलांचा हिस्सा मारला जात असून आमचं सरकार असलं तरी चुकीच्या नितीचा विरोध करणार, असं मत उदित राज यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सरकारी कार्यालयात भरतीच्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोपही उदित राज यांनी केला आहे. त्यामुळे २६ डिसेंबरला रामलीला मैदानात सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचं उदित राज म्हणालेत.

 

COMMENTS