भाजप आमदाराच्या जाचाला कंटाळून सावत्र बहिणीचा आत्महत्येचा प्रयत्न !

भाजप आमदाराच्या जाचाला कंटाळून सावत्र बहिणीचा आत्महत्येचा प्रयत्न !

नंदुरबार- भाजप आमदाराच्या जाचाला कंटाळून सावत्र बहिणीनं आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. तळोदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार उदयसिंग पाडवी यांची सावत्र बहीण राधा कोचरु पाडवी ‍यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तळोदा तालुक्यातील सोमावल येथे ही घटना घडली असून राधा यांनी सावत्र भाऊ अर्थात आमदार उदयसिंग पाडवी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची पोलिसांत तक्रार दिली आहे.

दरम्यान आमदार उदयसिंग पाडवी यांनी त्यांच्या पदाचा वापर करत वडिलोपार्जित जमीन आणि रॉकेलचे लायसन्स बळकावले.असल्याचा आरोप राधा यांनी केला आहे. तसेच सावत्र भाऊ-बहिणीला मालमत्तेत त्यांचा हिस्सा दिला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राधा पाडवी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यामुळे त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS