भाजप उज्ज्वल वारसा विसरुन साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण करतंय, भाजप आमदाराचा घरचा आहेर !

भाजप उज्ज्वल वारसा विसरुन साम, दाम, दंड, भेदाचे राजकारण करतंय, भाजप आमदाराचा घरचा आहेर !

मुंबई – भाजप उज्ज्वल वारसा विसरून साम दाम दंड भेदाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोटेंनी केला आहे.धुळे महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार गोटे यांना न सोपवता वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यावर  सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पक्षावर नाराज झालेले धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

पक्षातील जुन्या निष्ठावंतांना भाजप कार्यकत्यांना उमेदवारी देण्यासाठी गोटे आग्रही होते. परंतु इतर पक्षातील लोकांना पक्षात प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे इतर पक्षातूल आलेल्यांना उमेदवारी देण्यास अनिल गोटे यांनी विरोध केला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवून गोटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान जळगाव आणि जामनेर पालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचे विजयाचे शिलेदार ठरलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धुळे महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. जळगावप्रमाणे धुळ्यातही भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात गटबाजी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी धुळ्यात भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी गिरीश महाजन आणि भाजप प्रदेक्षाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे अनिल गोटे हे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी घरजा आहेर दिला आहे.

COMMENTS