भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा !

भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा !

मुंबई – राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर आता भाजपच्या आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदाराला कोरोना झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आणि घसा खवखवण्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत.

दरम्यान यापूर्वी ठाकरे सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या तिघांनीही कोरोनावर मात केली असून तीन दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आज भाजप आमदाराला कोरोना झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS