भाजप आमदार अपूर्व हिरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, अनेक नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे जयंत पाटलांचे संकेत !

भाजप आमदार अपूर्व हिरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, अनेक नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे जयंत पाटलांचे संकेत !

मुंबई – नाशिकमध्ये भाजपला धक्का बसला असून भाजपचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या प्रशांत हिरे, अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अपूर्व हिरे यांनी प्रवेश केला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीत येण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत, येणा-या काळात असे प्रवेश होत राहतील असे संकते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहेत. तसेच मध्यंतरीच्या काळात काही गैरसमज निर्माण झाले, तो दुरावा मिटलाय. नाशिकच्या राजकारणात हिरे कुटुंबियांना योग्य ते स्थान दिले जाणार असल्याचं यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS