विधानसभा निवडणुकीत डावललं, कार्यकारिणीतही स्थान नाही, भाजप नेत्या मेधा कुलकर्णी नाराज?

विधानसभा निवडणुकीत डावललं, कार्यकारिणीतही स्थान नाही, भाजप नेत्या मेधा कुलकर्णी नाराज?

मुंबई – राज्यातील भाजपची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, विधानसभा-विधानपरिषदेला डावलले गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना स्थान मिळेल अशी दाट शक्यता होती मात्र त्यांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही.

दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलून त्यांच्या जागी भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
त्यामुळे भाजपच्या कार्यकारिणीत त्यांना स्थान मिळेल अशी दाट शक्यता होती. परंतु या यादीत त्यांना कुठेही स्थान मिळालं नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णी या पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

या प्रमुख कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत आहोत. कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नसून त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांच्याऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

भाजपची कार्यकारिणी यादी

महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण,

उपाध्यक्ष – माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर,
संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर असे 12 उपाध्यक्ष आहेत.

सेक्रेटरी – माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे.

COMMENTS