भाजपला मोठा धक्का, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची मुलगी अपक्ष निवडणूक लढवणार?

भाजपला मोठा धक्का, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची मुलगी अपक्ष निवडणूक लढवणार?

नंदुरबार – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुहास नटावदकर यांची कन्या अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. डॉ. समिधा सुहास नटावाडकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून त्या अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात डॉ. नटावदकर यांना मानणारा भाजपात मोठा वर्ग आहे. गेल्या तीन पिढ्यांपासुन डॉ नटावदकर हे भाजपमध्ये एकनिष्ठ आहेत. परंतु आगामी निवडणुकीत मात्र या कुटुंबातून एक व्यक्ती अपक्ष उमेदवारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS