विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

मुंबई – भाजपची आज विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. आज दुपारी 1 वाजता ही बैठक होत आहे. विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्बत झाले असून दुपारी एक वाजता औपचारीक घोषणा होणार आहे. भाजपचे 105 आमदार विधिमंडळातील भाजपच्या पक्ष कार्यालयात जमतील आणि देवेंद्र फडणवीस यांना नेता म्हणून निवडतील अशी माहिती आहे. यावेळी भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव आणि निरीक्षक सरोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली 105 आमदार स्वाक्षरी करून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत. त्यामुळे भाजपच्या आजच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं जाहीर केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसेना-भाजपमध्ये तणाव वाढला आहे. भाजप- शिवसेनेचं कोणत्याही तणावाशिवाय सरकार स्थापन होईल अशी स्थिती नाही. शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसली आहे.

 

त्यामुळे भाजपनं शिवसेनेपुढे आता एक मोठी ऑफर ठेवली अससल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच केंद्रात एक वाढीव कॅबिनेट मंत्रीपदाबरोबरच राज्यातील महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्याची तयारीही भाजपनं दर्शवली असल्याची माहिती आहे. यात अर्थमंत्री, कृषीमंत्री, गृहराज्यमंत्रीपद शिवसेनेला देऊ असंही भाजपनं म्हटलं असल्याची माहिती आहे.

COMMENTS