भाजपचे विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर, पुण्यातून मेधा कुलकर्णींचा पत्ता कट!

भाजपचे विधान परिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर, पुण्यातून मेधा कुलकर्णींचा पत्ता कट!

पुणे – भाजपचे विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, अमरावतीतून नितीन भांडे तर पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या पाचही जागा लढवण्याची तयारी केली असल्याचं दिसत आहे. पुढील महिन्यात 1 डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार ते पाहण गरजेचं आहे.

दरम्यान पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा होती.परंतु या यादीतून मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या जागेसाठी  महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्याही नावाची चर्चा होती पण, अखेर सर्व नावे वगळून सांगलीच्या संग्राम देशमुख यांचे नाव जाहीर झाले आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरीष बोराळकर हे दोन टर्म आमदार राहिले असून तिसय्रांदा ते मैदानात उतरले आहेत.

मागील निवडणुकीत शिरीश बोराळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते सतीश चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून यंदा पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे. परंतु राष्ट्रवादीनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. तसेच भाजपकडून नागपूरमधून संदीप जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  तर दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

COMMENTS