काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला हा ज्येष्ठ नेता शिवसेनेच्या वाटेवर?

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला हा ज्येष्ठ नेता शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई – भाजप नेते हर्षवर्धन पाटील पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतलीय. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.पाटील हे पुन्हा वेगळा विचार करत असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे हातातील कमळ सोडून शिवबंधन बांधणार का? हा प्रश्न आता विचारला जातोय.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु निवडणुकीपूर्वी भाजपात जाण्यासाठी चढाओढ होती, आता महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्याने वारे वेगळ्या दिशेने वाहू लागले असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता हर्षवर्धन पाटील वेगळा विचार करतायत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

COMMENTS