“भाजपमध्ये मेगाभरती झाली, पण कचरा आला आहे”, ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा !

“भाजपमध्ये मेगाभरती झाली, पण कचरा आला आहे”, ‘या’ नेत्यानं दिला राजीनामा !

नागपूर – भाजपमध्ये मेगाभरती झाली, पण कचरा आला आहे असं म्हणत राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री दर्जा असेलेले, शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मुख्यमंत्री सोडल्यास भाजपचे नेते प्रामाणिकपणे काम करत नाहीत, मला विधानपरिषद आमदार करण्याचा शब्द भाजपने पाळला नाही. त्यामुळे भाजपपासून लांब जातोय असं तिवारी यांनी म्हटलं आहे. तसेच किशोर तिवारी यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

दरम्यान तिवारी यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसला आहे. तसेच तिवारी यांनी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देण्याचं ठरवलं असून शिवसेनेनं संधी दिल्यास मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या नागपूर दक्षिण – पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण तयार असल्याचं किशोर तिवारी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेमध्य युती झाली नाही तर किशोर तिवारी यांना शिवसेना मुख्यमंत्र्यांविरोधात उमेदवारी देणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS