भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी ‘या’ पाच नेत्यांची नियुक्ती, काही प्रवक्ते, जिल्हाध्यक्षांचीही नियुक्ती!

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी ‘या’ पाच नेत्यांची नियुक्ती, काही प्रवक्ते, जिल्हाध्यक्षांचीही नियुक्ती!

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), मा. योगेश गोगावले (पुणे) व अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा, प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे.

योगेश गोगावले

दरम्यान पाटील यांनी काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या असून पुणे शहराध्यक्ष आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमांच्या संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

माधुरी मिसाळ

नवनियुक्त प्रवक्ते

मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे व वैयक्तिक कारणांमुळे पुढील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील व रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर व व्यापारी आघाडी दिलीप कंदकुर्ते यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

COMMENTS