महाराष्ट्रात बर्ड फ्लू’चा फैलाव ; हाय ॲलर्टची गरज

महाराष्ट्रात बर्ड फ्लू’चा फैलाव ; हाय ॲलर्टची गरज

जालना: करोनाला हद्दपार करण्यासाठी लवकरच लसीकरण सुरू होत असताना राज्यासमोर बर्ड फ्लूच्या रूपानं नवं संकट उभं ठाकलं आहे. राज्यातील पाच जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात हाय अॅलर्ट घोषित करण्याची गरज असून राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

टोपे म्हणाले, ‘बर्ड फ्लू हा अत्यंत धोकादायक आजार असून या आजाराचा मृत्यू दर १० ते १२ टक्के आहे. हे लक्षात घेता ‘बर्ड फ्लू’बाबत जास्तीत जास्त सावधानता बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यात हायअॅलर्ट जारी करायला हवा. पशुसंवर्धन व आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू करायला हव्यात, असंही त्यांनी सांगितले.

परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाण्यात कावळे व पोपट बर्ड फ्लूनं मरण पावले आहेत. कोंबड्यांच्या बाबतीत खबरदारी घेणं तुलनेनं सोपं असलं तरी कावळे व पोपटांचा संचार कसा रोखणार, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी मांडलेलं मत अत्यंत महत्त्वाचं आहे.

COMMENTS