ब्रेकिंग न्यूज – बिहार विधानसभा निवडणूक – काँग्रेस – आरजेडीला काठावरचं बहुमत !

ब्रेकिंग न्यूज – बिहार विधानसभा निवडणूक – काँग्रेस – आरजेडीला काठावरचं बहुमत !

विविध एक्झिट पोलचा अंदाज –

सर्व पोलचा एकत्रित अंदाज

एकूण जागा – 243

आरजेडी – काँग्रेस – 122

भाजप – जेडीयू – 112

इतर –    09

रिपब्लिकचा अंदाज

एकूण जागा – 243 जागा

आरजेडी – काँग्रेस – 91 ते 117

बीजेपी – जेडीयू -118 ते 138

इतर          – 5 ते 12

 

टीव्ही 9 चा अंदाज –

एकूण जागा – 243 जागा

आरजेडी – काँग्रेस – 115 ते 125

बीजेपी – जेडीयू – 110 ते 120

इतर          – 15 ते 20

 

C Voter चा अंदाज

एकूण जागा – 243

आरजेडी-काँग्रेस – 120

बीजेपी-जेडीयू – 116

इतर – 07

 

2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयू महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान आज पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी मतदान झाले, दुसर्‍या टप्प्यातील 94 जागांसाठी तीन नोव्हेंबरला मतदान झाले आणि तिसर्‍या टप्प्यातील 78 विधानसभा जागांसाठी आज मतदान झाले आहे.बिहारमधील एकूण 243 विधानसभा जागांपैकी 38 जागा अनुसूचित वर्गासाठी तर दोन जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. बिहारमध्ये एकूण 7,29,27,396 मतदार आहेत. त्यापैकी 1,60,410 सेर्व्हीस मतदार आहेत. तिसय्रा टप्प्यातील मतदान आज पार पडल्यामुळे सर्वांचं लक्ष आता या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. परंतु यापूर्वीच काही माध्यमांनी आपला एक्झिट पोल जाहीर केले आहेत.

COMMENTS