भूम – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश कांबळे यांचा फटका नेमका कोणाला, घड्याळाला की बाणाला?

भूम – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश कांबळे यांचा फटका नेमका कोणाला, घड्याळाला की बाणाला?

उस्मानाबाद – परांडा विधानसभा मतदारसंघ तीन तालुक्यांमध्ये विस्तारला आहे. त्यामुळे प्रचार करताना सर्वच प्रमुख उमेदवारांची दमछाक होत आहे. राष्ट्रवादीकडून राहुल मोटे चौथ्यांदा रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेकडून प्राध्यापक तानाजी सावंत आमदार असूनही त्यांना जनतेतून स्वतःला सिद्ध करायच आहे. या दोन्ही धनाढ्य उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश कांबळे टक्कर देत आहेत.

या मतदारसंघातील जातीय समीकरणचा विचार केला तर धनगर समाजाची मते मोठ्याप्रमाणावर आहेत. शिवाय ओबीसीचा वर्गही या मतदारसंघात मोठा आहे. एकीकडे दोन मराठा आणि एक ओबीसीमधील उमेदवार असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कांबळे यांच्या उमेदवारीचा फटका बसणार याची चर्चा होत आहे. की दोन्हींच्या वादात कांबळे बाजी मारणार याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक निवडणुकीमध्ये ओबीसी व इतर वर्ग काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी असायचा. परंतु गेल्या पंचवार्षिकमध्ये ओबीसी आणि इतर वर्गाने कॉंग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडली आहेत. हा वर्ग शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने झुकला. दरम्यान भूम शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून सुरेश कांबळे यांनी काही काळ कारभार सांभाळला. परंतु मतभेद झाल्याने कांबळे यांनी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्याने थेट वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मिळाली आहे.

त्यामुळे भूम तालुक्यात शिवसेनेला याचा फटका सहन करावा लागेल. याशिवाय तालुक्यातील अनेक गावात कांबळे यांचा चांगला जनसंपर्क आहे. अनेक गावातील ग्रामपंचायतीही त्यांच्या गटाच्या ताब्यात आहेत. धनगर समाज तसेच ओबीसी समाजालाही त्यांनी सोबत घेतला आहे. त्यामुळे आता कांबळे यांच्या उमेदवारीचा फटका नेमका बाणाला की घड्याळाला याची उत्सुकता आहे. का यामध्ये कांबळे यांची गॅस सिलेंडर बाजी मारणार याची चर्चा मतदारांमध्ये होत आहे.

COMMENTS