पण आम्ही जीवंत राहिलो तर रोजगार मिळेल ना, नाणारवरुन भास्कर जाधव यांचा हल्लाबोल !

पण आम्ही जीवंत राहिलो तर रोजगार मिळेल ना, नाणारवरुन भास्कर जाधव यांचा हल्लाबोल !

नागपूर – कोकणातील नाणार प्रकल्पाला विरोध करत आज विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलं. नाणारच्या मुद्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांसह शिवसेना आमदारांनी वेलमध्ये उतरुन नाणार प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनीही सरकारविरोधात जोरदार आंदोलन केली. नाणारकडे राजकीय विषय म्हणून पाहू नये, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी वक्तव्य केलं होतं, अणु प्रकल्प आणि रिफायनरी जगात कुठेही एकत्र नाहीत. दोन्हीमधील हवाई अंतर १.८ किलोमीटर असून अपघात झाला तर बाजूच्या जिल्ह्यांना आणि पूर्ण कोकणाला धोका आहे. त्यामुळे  मोठ्याप्रमाणात रोजगार मिळेल असे सांगतात, पण आम्ही जीवंत राहीलो तर रोजगार मिळेल असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.

दरम्यान कोकणात प्रकल्प आले पाहिजेत पण दोन्ही प्रकल्प एकत्र करणं हे विनाशाला निमंत्रण आहे. तसेच शिवसेनेने नियमानुसार मुद्दा मांडावा असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच नाणारला प्रकल्पाला आमचा विरोध कायम असून सरकारने हा हट्ट सोडावा तसेच पाहिजे तर प्रकल्प विदर्भात घेऊन जा असंही जाधव यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS