बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय, ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक !

बच्चू कडूंचा मोठा राजकीय निर्णय, ‘या’ मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक !

अमरावती- 2019 ची लोकसभा निवडणुक जाहीर होण्यास अजून चार पाच महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी अनेक पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तर लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी मतदारसंघाचीही निवड केली आहे. ते त्यांच्या जिल्ह्यातल्या नाही तर विदर्भातून निवडणूक लढवण्यासाठी थेट मराठवाड्यात येणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून ते यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना टक्कर देणार आहेत.

शेतकऱ्यांना ‘साले’ संबोधल्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका झाली होती. कोणीपण यावे शेतकऱ्यांनी काहीपण बोलावे हे खपवून घेतले जाणार नाही, शेतकऱ्यांच्या अस्मितेचा मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवे यांना धडा शिकविण्याकरिता आपण हा निर्णय घेतला आहे अशी माहिती बच्चू कडू यांनी काल अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलतना दिली. जनसामान्यांचे, पीडित, शोषितांचे प्रश्न मांडून आणि त्यासंदर्भात आगळे वेगळे आंदोलन करून आमदार  बच्चू कडू  यांनी अनेक हितकारक निर्णय सरकारकडून करून घेतले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात बच्चू कडू यांचे एक वेगळे व्यक्तिमत्त्व उदयास आले आहे.

रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघाची तुलना बिहारसारख्या राज्याची केली असून अनेक अवैध धंद्यांना रावसाहेब दानवे यांचा आशीर्वाद असल्याची टीका आमदार कडू यांनी केली नोटबंदीच्या काळामध्ये दानवे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले होते असा आरोपही केला आहे एकीकडे सामान्य व्यक्तीच्या खिशात पाचशे रुपये सुद्धा सापडत नव्हते अशा वेळेस कोट्यावधी रुपये आले कुठून असा सवाल आमदार कडू यांनी उपस्थित केला आहे.

बच्चू कडू यांच्या या निर्णयानंतर इतर राजकीय पक्ष काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विरोधकांचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरतील का याची उत्सुकता लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बच्चू कडू यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिवसेना त्यांना पाठिंबा देता की वेगळा उमेदवार उभे करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे काय करणार ते पाहणंही औत्सुक्याचं राहणार आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

COMMENTS