बच्चू कडू हजारो शेतकऱ्यांसह दिल्लीकडे रवाना

बच्चू कडू हजारो शेतकऱ्यांसह दिल्लीकडे रवाना

अमरावती – कृषी विधेयकाच्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या प्रहार संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनासह दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी गुरूकूंज मोझरी येथुन शेतकरी व कार्यकर्ते दुचाकी, चारचाकी वाहनांसह ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या आंदोलनासाठी सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी विधेयकाच्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या नऊ दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. तीन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी ट्विट करून कृषी बिलाच्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या एल्गार सुरू आहे. चलो दिल्लाचा नारा देत ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकर्यासोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता.

आज ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. त्यांचा मुक्काम हा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे होणार आहे. उद्या राज्यमंत्री बच्चू कडू मध्यप्रदेशची सीमा ओलांडणार आहे. सीमा ओलांडल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या घराला घेराव घालणार आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण हे मध्य प्रदेशात येऊ देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की कुठल्याही सरकारच्या दबावाला बळी न पडता शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमीकावा करून थेट दिल्ली गाठणार असल्याच बच्चू कडू यांनी स्पष्ट केल आहे.

COMMENTS