रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती – बच्चू कडू

रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती – बच्चू कडू

मुंबई – रावसाहेब दानवे यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली आहे. ‘रावसाहेब दानवे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कसे आहेत हेच कळत नाही. रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आहे. आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी चुकीची भाषा वापरुनही पक्षाकडून त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नव्हती. या निवडणुकीत आम्ही त्यांना उत्तर देणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर टीका केली आहे.  देशभरातले चोट्टे एक झालेत. तुम्ही माझ्या मागे उभं राहण्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो आणि त्यांना (विरोधकांना) पैसे भेटू नाही राहिले अशी दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले चोट्टे एक झालेत. आपल्याकडेही सगळे चोट्टे एकत्र झाले आहेत आणि रावसाहेब दानवेला पाडू असं म्हणू लागलेत. असं दानवे यांनी म्हटलं आहे. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं असून दानवेंना पैशांची मस्ती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS