प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण, भूमिपूजनानंतर पंतंप्रधान मोदींचे उद्गार !

प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण, भूमिपूजनानंतर पंतंप्रधान मोदींचे उद्गार !

लखनऊ –  राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींनी
उपस्थितांना संबोधित केले.ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण होत असल्याची भावना नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचं नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात.

दरम्यान इराण आणि चीनमध्ये देखील रामाचे प्रसंग किंवा राम कथांचं वर्णन मिळेल. श्रीलंकेत जानकीहरण म्हणून रामायण सांगितलं जातं. अशाचप्रकारे जगातील कितीतरी देश आहेत. जेथे राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत.जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचं व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील असंही मेदींनी म्हटलं आहे.

COMMENTS