राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा!

कोल्हापूर – विधानसभा निवडणुकीला अवघे तीन दिवस राहिले आहेत. अशातच आता राष्ट्रवादीला धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षानं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम जे पाटील यांनी शिवाजी पाटील यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

चंदगडमधून काँग्रेस आघाडीकडून राजेश पाटील रिंगणात आहेत तर महायुतीकडून संग्राम कुपेकर हे रिंगणात आहेत. या दोघांविरोधात भाजप समर्थक आणि बंडखोर अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. अशातच आता शिवाजी पाटील यांची या मतदारसंघात ताकद वाढली असुन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम जे पाटील यांनी शिवाजी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना धक्का बसला आहे.

COMMENTS