अरुण लाड यांनी मारलं मैदान. पुणे मतदारसंघात चंद्रकांत पाटलांना धक्का

अरुण लाड यांनी मारलं मैदान. पुणे मतदारसंघात चंद्रकांत पाटलांना धक्का

सातारा : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांना धूळ चारली. अरुण लाड यांना १ लाख २२ हजार मते मिळाली. तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काॅंग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपने गमावल्याने चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनी प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुढ मतदारसंघातून विजय मिळवला. यामुळे पदवीधर मतदरसंघातून सांगलीच्या संग्रामसिंह देशमुख यांना भाजपने उमदेवारी दिली होती. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अरुण लाड यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सतेज पाटील, विश्वजीत कदम यांनी ताकद लावली होती. लाड यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीसह काॅंग्रेस आणि शिवसेनेही आपली ताकद पणाला लावली. प्रचारात भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडून घेतलेल्या मेहनतीमुळे दि. १ डिसेंबर रोजी विक्रमी मतदान झाले होते. अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते  मिळाली आहेत. तर भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली. त्यामुळे अरुण लाड यांनी तब्बल ४८ हजार ८२४ मतांनी विजय मिळवला आहे. हा मतदारसंघ मागील तीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो

शिक्षक मतदारसंघात काॅग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत असून भाजपचे जितेंद्र पवार पिछाडीवर आहेत. या मतदारसंघाचा निकाल दुपारीपर्यंत स्पष्ट होईल.

 

COMMENTS