गरिबांना 1 रुपये किलो तांदूळ तर नववधूला 1 तोळे सोनं मोफत, ‘या’ राज्यातील सरकारची घोषणा !

गरिबांना 1 रुपये किलो तांदूळ तर नववधूला 1 तोळे सोनं मोफत, ‘या’ राज्यातील सरकारची घोषणा !

नवी दिल्ली – केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेसाठी विविध योजना लागू केल्या जात आहेत. आसाम सरकारनंही राज्यातील जनतेसाठी एका योजनेची घोषणा केली आहे. ज्यात गरिबांना 1 रुपये किलो तांदूळ आणि नववधूला 1 तोळे सोनं मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात आसामचे अर्थमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आर्थिक वर्ष 2019-20साठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची देशभरात चर्चा सुरु आहे.

या अर्थसंकल्पात स्वस्त पोषण आहार सहाय्यता योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्याअंतर्गत 53 लाख लाभार्थी कुटुंबीयांना खाद्य सुरक्षेंतर्गत तीन रुपयांऐवजी प्रतिकिलो एक रुपयानं तांदूळ मिळणार आहेत.  तसेच विधवा आणि दिव्यांगांसाठी सामाजिक सुरक्षेच्या योजना आणि अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी उच्च शिक्षण मिळण्यासाठी काही योजनांची घोषणाही करण्यात आली आहे.

चहा बागायत क्षेत्रातील चार लाख कुटुंबांना मोफत तांदूळ पुरविण्यात येणार आहे. तसेच चहा बागायत क्षेत्रातील मजुरांच्या कुटुंबीयांना दोन रुपये किलोनं साखर देण्यात येणार आहे. 45 वर्षांच्या महिलेच्या पतीचं निधन झाल्यास तिच्या कुटुंबीयांना तात्काळ मदतीच्या स्वरूपात 25 हजार रुपये प्रदान करण्याची घोषणाही आसाम सरकारनं केली आहे.

तसेच त्या पत्नीला 60 वर्षांच्या वयोमर्यादेपर्यंत प्रतिमहिना 250 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. 60 वर्षांच्या नंतर त्या महिलेला वृद्धावस्थेतील पेन्शनचाही लाभ मिळणार आहे, अशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

 

COMMENTS