सोलापूरमध्ये हो‌णारी अमित शाहांची सभा उधळून लावण्याचा इशारा!

सोलापूरमध्ये हो‌णारी अमित शाहांची सभा उधळून लावण्याचा इशारा!

सोलापूर – भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या म्हणजेच 1 सप्टेंबररोजी सोलापूर येथे सभा पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला ते उपस्थिती राहणार आहेत.परंतु अमित शहांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. अमित शाहांच्या सभेला ‘भीम आर्मी सोलापूरचा’ विरोध आहे. राज्यातील दलित सुरक्षित नाहीत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री सभा घेत फिरत आहेत, असा आरोप भीम आर्मीने केला आहे. त्यामुळे भाजपच्या उद्या होणाय्रा सभेत मोठा गोंधळ होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात भाजपाची महाजनादेश यात्रा काठली.  या यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध भागांना भेट दिली. तसेच सरकारने राबवलेल्या योजनांची माहितीही मुख्यमंत्री मतदारांना दिली. या यात्रेचा समारोप उद्या सोलापुरात पार पडणार आहे. या समारोपाला स्वत: अमित शहा उपस्थिती राहणार आहेत. परंतु शाहांची सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीने इशारा दिला आहे.

COMMENTS