सत्ता स्थापनेबाबत अमित शाहांचा भाजप नेत्यांना महत्त्वाचा संदेश!

सत्ता स्थापनेबाबत अमित शाहांचा भाजप नेत्यांना महत्त्वाचा संदेश!

मुंबई – राज्यातील सत्ता स्थापनेबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शाह यांनी राज्यातील भाजप नेत्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.
सत्ता स्थापनेचं गणित सोडवण्यासाठी अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार होते. मात्र अचानक शाह यांचा हा दौरा रद्द झाला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राज्य स्तरावर यातून मार्ग काढावा, असं अमित शहांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला कोणता नवा प्रस्ताव देतात, हे पाहणं गरजेचं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत चाललेला संघर्ष हा मुख्यमंत्रिपदासाठी नसून चांगली खाती मिळावण्यासाठी असल्याची माहिती आहे. नगर विकास, गृह यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर शिवसेनेनं दावा सांगितला आहे. म्हणूनच भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS