राज्यात नवं समीकरण पहायला मिळणार?, अजित पवारांचं सूचक वक्तव्य!

राज्यात नवं समीकरण पहायला मिळणार?, अजित पवारांचं सूचक वक्तव्य!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रे पार्टी विरोधी पक्षातच बसणार असून भाजपा – शिवसेनेचे काय ठरलं त्यांनाच माहीत, आम्ही सरकारच्या चुका दाखवण्याचं काम करू असंही अजित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात राज्यात सत्तेचं नव समीरकरण पाहायला मिळतं की काय? अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालं. यावरही बोलताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाने माझ्यासमोर सक्षम उमेदवार उभा केला होता. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मताधिक्याचे आकडे मी दबकत-दबकत सांगत होतो. पण, मतदारांनी मला मोठा आशीर्वाद दिला असल्याचे म्हणाले.

COMMENTS