“समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं” असं का म्हणाले अजित पवार? वाचा ही बातमी!

“समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं” असं का म्हणाले अजित पवार? वाचा ही बातमी!

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केलं. ट्वीट डिलीट केल्याचं कारण आता अजित पवार यांनी सांगितलं आहे.”समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी डिलीट केलेल्या ट्वीटबाबत दिली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी आज सकाळी सहा वाजता पुणे मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहाणी केली. कामांची पाहाणी करताना मेट्रोचं काम वेळेत पूर्ण करा, अशा सूचना देखील त्यांनी यंत्रणेला दिल्या. त्यानंतर अजित पवार यांनी भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक आणि ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती जागवणारे ट्वीट केलं. मात्र, काही वेळातच अजित पवार यांनी संबंधित ट्वीट डिलीट केलं. “ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं.  परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं, इतर गोष्टीही असतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS