राज्यातील शाळा कधी सुरु होणार ?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती !

राज्यातील शाळा कधी सुरु होणार ?, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती !

पुणे – कोरोना संकटकाळात पालक आणि मुख्याध्यापकांची मुलांबाबत असलेली काळजी लक्षात घेता राज्यातील शाळा 1 जुलैला सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यात जून महिन्यात शाळा सुरू करण्याच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

दरम्यान राज्य सरकारचे जून महिन्यात शाळा सुरू करण्याबाबत अजिबात काही ठरलेले नाही. मी कालच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. आमचा 1 जुलैला शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत अंतिम कोणताही निर्णय झालेला नाही. 1 जुलैला शाळा सुरू केल्यानंतरही सुरुवातीचे काही दिवस बुडतील. या सर्व बुडालेल्या दिवसांची भरपाई ही दिवाळी आणि ख्रिसमसची सुट्टी कमी करता येईल, तसेच एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्ट्यादेखील कमी करून शैक्षणिक दिवस भरून काढण्याबाबत विचार सुरू आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.

COMMENTS