कुणाची किती मुलं, सांगू का? – अजित पवार

कुणाची किती मुलं, सांगू का? – अजित पवार

मुंबई – धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही त्यावरून विरोधक टीका करत आहेत. यावर अजित पवार यांनी विरोधकांना दम देऊन मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली सांगू का? असा इशारा त्यांनी दिला. कुणाला किती मुलं होती. कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अशा बऱ्याच गोष्टी मला माहीत आहे, सांगायलाच हव्या का? असा सवालही त्यांनी केला.

अजित पवार म्हणाले, आता विरोधकांना काय म्हणाव. एकदा समर्थन केल्याने आता तोंडघशी पडले आहेत. पहिल्यांदा काही तरी थातूरमातूर उत्तर द्यायचे आणि त्यामध्ये लोकांची दिशाभूल करायची हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. तसंच धनंजय मुंडे साहेबांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितलं आहे. मग जर रेकॉर्ड पहायचं झालं तर अनेकांनी काय काय थोडी लपवाछपवी केली आहे ते सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना. कोणाला किती मुलं होती आणि कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाचं लग्न झालं नव्हतं. अशा बर्यातच गोष्टी असतात. कशाला त्या खोलात जायला सांगता,” असा टोला अजित पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणावरुन विरोधकांना लगावला.

COMMENTS