तर मला कपडे काढून जावं लागेल – अजित पवार

तर मला कपडे काढून जावं लागेल – अजित पवार

पुणे – जुन्नर येथील शिवप्रेमींच्या जाहीर मेळाव्यात बोलत असताना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीनंतर वीजबिल माफीच्या मागणीवरुन चांगलीच टोलेबाजी केली आहे. आता सगळंच जर माफ करायला लागलो, तर कपडे काढून मला जावं लागेल. त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायचं असा टोला अजित पवारांनी वीजबिल माफीच्या प्रस्तावावरुन लगावला आहे. आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीतरी शिकण्याची आणि बोध घेण्याची गरज आहे, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान आज शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या विचाराने काहीतरी शिकण्याची आणि बोध घेण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीनंतर वीजमाफीचा प्रस्ताव भर सभेत मांडला. त्यावर अजित पवारांनी सगळंच जर माफ करायला लागलो तर कपडे काढून मला जावे लागेल. त्यामुळे आपल्याला झेपेल तेवढेच करायचं, असा टोला लगावला. तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दोन लाखांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफ करणार असून, त्यासंदर्भातली माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. आजच त्यावर निर्णय घेणार असून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याला थेट पैसे जमा केले जाणार आहेत. जे शेतकरी नियमित कर्ज भरत असतात त्यांच्यासाठीही चांगल्या पद्धतीची मदत करु असंही अजित पवार यावेळी म्हणालेत.

COMMENTS