राज्यात व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची हमी !

राज्यात व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची हमी !

मुंबई – राज्यात व्हेंटीलेटरचा तुटवडा जाणवणार नाही याबाबतची काळजी घेण्यात येणार असल्याची हमी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबरोबर मी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे मुख्य सचिव यांनी चर्चा केली असल्याचही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यात आता हा आकडा 101 वर गेला आहे. कालच साताऱ्यात एक जण आढळला. नागपूरमध्ये पोलिस कडक संचारबंदी पाळण्यासाठी काम करत आहेत. मुंबईतही तशीच संचारबंदी दिसायला हवी, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या. तसेच संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारने जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यात कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका, सकाळी 7 ते 11 भाजी मार्केट सुरु राहणार आहेत, मात्र एकट्यानेच जा, अशी तंबीही अजितदादांनी दिली आहे.

सुशिक्षित नागरिक मोठ्याप्रमाणात बाहेर पडत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बाजारात जाताना एकट्याने जावे. कारण नसताना बाहेर पडाल तर पोलिस कारवाई करतील. तसेच ‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

 

 

COMMENTS