अर्जून खोतकर तुम्ही सत्याची बाजू घ्या, सत्तेची नाही –अजित पवार

अर्जून खोतकर तुम्ही सत्याची बाजू घ्या, सत्तेची नाही –अजित पवार

मुंबई – लाळ्या खुरकत रोगाच्या निविदा प्रक्रियेत दिरंगाई आणि निष्काळजीपणा झाला असून डिसेंबरच्या अधिवेशनात याची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र याची अद्याप चौकशी सुरू झाली नसल्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कबुली दिली असून येत्या एक महिन्याच्या आत याची चौकशी करू आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं खोतरांनी म्हटलं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.तसेच हरियाणात बोगस लस पुरवणा-या बायोवेट कंपनीला हे कंत्राट देऊन बोगस लस राज्यात पुरवण्याची तयारी या सरकारनं केली असल्याचा आरोपही अजितदादांनी केला आहे.  ते हल्लाबोल मोर्चादरम्यान बोलत होते.

दरम्यान मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असून दोन कोटी जनावरांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचंही अजितदादांनी म्हटलं आहे. तसेच सात वेळा लसखरेदीसाठी निविदा मागवल्याची कबुली राज्यमंत्र्यांनी दिली असून पशुसंवर्धन आयुक्त यांनी सचिवांचे आदेश या प्रकरणात मानले नाहीत त्यामुळे सचिव मोठे की आयुक्त?  असा सवाल अजितदादांनी केला आहे. शिवसेना मंत्री अर्जून खोतकर तुम्ही सत्याची बाजू घ्या, सत्तेची नाही, उद्धव ठाकरेंनी तुम्हाला हेच सांगितले आहे ना असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS