दादा अकरानंतर कार्यक्रम घेत जा, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, लवकर उठण्याची सवय करुन घ्या!

दादा अकरानंतर कार्यक्रम घेत जा, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, लवकर उठण्याची सवय करुन घ्या!

पुणे – पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यलयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी आव्हाड यांनी अजित पवारांकडे कोणतेही कार्यक्रम अकरानंतर घेण्याची मागणी केली. दादांचा जेवढा उरक आहे, तेवढा आमचा नसेल. त्यामुळे पुढचे कार्यक्रम अकरानंतर घेतलेत तर बरं होईल, असा आग्रह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केला. त्यावर जरा लवकर उठण्याची सवय करुन घ्या, असं म्हणत अजित पवारांनी चिमटे काढले.

दरम्यान दादांनी सकाळी 10 वाजता कार्यक्रम लावला. मी निघालो ठाण्याहून. काल रात्रीचा माझा कार्यक्रम. कारण मी बंगल्यावरच बसतो दहा-अकरा वाजेपर्यंत. तेव्हा दादा, जरा यापुढचे कार्यक्रम अकरा नंतर घेतलेत, तर आमची झोप पूर्ण होत जाईल. प्रवासाचा वेळही तेवढा कमी होईल’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.‘तुम्हाला झोप लागते पाच तास. आम्हाला लागते सहा-सात तास. तेवढा आमचाही जरा विचार करा’ असं आव्हाड मिष्किलपणे म्हणाले.

त्यावर अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांचं राजकारण समाजकारण जवळून पाहिलं आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना कधी रात्री दोन वाजता झोपायचे, तरी सकाळी सातला तयार असायचे. ती जी सवय लागली. ती कायमची लागली, तशी सवय तुम्ही पण लावून घेतली, तर बरं होईल. सात वाजता निघायचं नाही, कामाला लागायचं. त्यासाठी तिथनं चारला निघाला असतात, तर इथे सातला पोहचला असतात, अशा कानपिचक्याही अजित पवारांनी यावेळी लगावल्या.

COMMENTS