राधाकृष्ण विखे पाटलांना सूर्य तिथे उगवेल असं वाटलं होतं, रोहित पवारांच्या मतदारसंघात अजितदादांची टोलेबाजी!

राधाकृष्ण विखे पाटलांना सूर्य तिथे उगवेल असं वाटलं होतं, रोहित पवारांच्या मतदारसंघात अजितदादांची टोलेबाजी!

अहमदनगर – उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे पुतण्या रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड या मतदारसंघ गेले होते. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला. कर्जत जामखेड हा माझा आवडता मतदारसंघ आहे, या तालुक्यांशी माझे भावनिक नाते आहे. रोहित पवार यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिल्याने सर्वांचे आभार. आमचा रोहित म्हणतो, ‘काका हे करा, काका ते करा’, अनेक मंत्र्यांना तो भेटतो असं म्हणत अजितदादांनी आमदार रोहित पवारांचं कौतुक केलं.

दरम्यान निवडणुकीनंतर मी पहिल्यांदाच इथे आलो. रोहितला तुम्ही निवडून दिलंत, त्याबद्दल तुमचे आभार. आता तुमची जबाबदारी संपली आणि आमची सुरु झाली. आम्ही फक्त बोलत नाही, तर करुन दाखवतो, हे सर्वांना माहित आहे. मी तुमच्या आणि रोहितच्या पाठीशी आहे असंही अजित पवार म्हणाले.

तसेच श्रीगोंदा मतदारसंघात माजी आमदार राहुल जगताप यांचं ‘होय-नाय’ सुरु असल्यामुळे घनश्याम शेलार यांना उशिरा उमेदवारी दिली. नाहीतर घनश्याम शेलारही निवडून आले असते. पण राहुल जगताप यांचे वडील असते, तर झटपट निर्णय घेतला असता, तर राधाकृष्ण विखे पाटलांना सूर्य तिथे उगवेल, असं वाटलं होतं, मात्र तसं झालं नाही असा टोलाही अजितदादांनी लगावला.

COMMENTS