उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता!

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, ‘हा’ मोठा निर्णय होण्याची शक्यता!

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी बैठक पार पडणार आहे. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोनाची परिस्थिती, राज्यासमोरील आर्थिक आव्हान, पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स या मुद्द्यांवरही चर्चा केली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस करण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुधारित प्रस्ताव पाठवण्याबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान 9 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. परंतु उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नसल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील ठराव वैध नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. परंतु आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री अधिकृत पत्र देणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी तशा आशयाचं पत्र दिलं की मंत्रिमंडळ बैठक अधिकृत ठरते. त्यामुळे आजच्या अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार्‍या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत मंजूर केल्या जाणार्‍या प्रस्तावाला आक्षेप घेता येणार नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS