अजित पवारांनी केलं आदित्य ठाकरे आणि धीरज देशमुख यांचं कौतुक, म्हणाले…

अजित पवारांनी केलं आदित्य ठाकरे आणि धीरज देशमुख यांचं कौतुक, म्हणाले…

नागपूर – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. आदित्य नवखा आहे. सगळ्यांमध्ये मिसळतो. काय करता येईल हे सभागृहात पाहतो. त्याच्यात मी पणा दिसत नाही. अहंकार दिसत नाही,  हे कौतुकास्पद आहे. तर
काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांच्याबाबत, धीरज बोलताना तर मला काल विलासराव देशमुख बोलत आहेत का असं वाटलं, बोलण्याची स्टाईल, शब्दफेक अगदी हुबेहूब विलासरावांसारखीच असल्याचं वाटत होतं असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान मिटिंग असली आणि  कोणीही सीनिअर आले तर आदित्य लगेच खुर्ची खाली करुन देतो, मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे असं वागणं नाही तसेच त्याच्यामध्ये अहंकार नाही असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. याशिवाय अजित पवारांनी काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचंही कौतुक केलं. तसेच आमचा रोहित पण चांगला आहे, अदिती तटकरे, विश्वजीत कदम यंग टीम चांगलं काम करत असल्याचं म्हणत अजित पवार यांनी या सर्व नवनुर्वाचित आमदारांचं कौतुक केलं आहे.

COMMENTS