मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजू शेट्टींनी घेतलं आंदोलन मागे !

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजू शेट्टींनी घेतलं आंदोलन मागे !

नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्यातील दूध दरवाढीबाबातचं आंदोलन मागे घेतलं आहे. दूध उत्पादकांना लिटरमागे किमान २५ रुपये भाव तसेच ५ रुपये रुपांतरीत अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाचं स्वागत राजू शेट्टी यांनी केलं असून राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय चांगला आणि योग्य असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारने घेतलेला निर्णय भविष्यातला एक दिर्घकालीन उपायोजनांचा भाग असल्याचंही यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान हे आंदोलन प्रतिष्ठेचे करण्याची काहीही गरज नव्हती, शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा अशी आमची इच्छा होती. सरकारसोबतच्या चर्चेसाठी गिरीश महाजनांनी यासाठी बरीच धावपळ केली. यापूर्वी दूधावर देण्यात येणाऱ्या अनुदानाचा गैरफायदा होत होता. हे अनुदान लाटले जायचे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नव्हते. मात्र, सरकारने योग्य मार्ग काढत आजचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे दुधकोंडीचे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करीत उद्यापासून राज्यातील दूध पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी नागपूरमध्ये दिली आहे.

 

COMMENTS