आदित्यजी ठाकरे, आरेतील झाडे तोडणा-यांना मते देऊ नका, असं सांगा तरच तुमचा वृक्षतोडीला खरा विरोध आहे असं मुंबईकर मानतील…

आदित्यजी ठाकरे, आरेतील झाडे तोडणा-यांना मते देऊ नका, असं सांगा तरच तुमचा वृक्षतोडीला खरा विरोध आहे असं मुंबईकर मानतील…

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरेमधील शेकडो झाडांची सरकारने कत्तल केली आहे. पर्यावरण प्रेमींचा विरोध असल्यामुळे रात्री ही झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याविरोधात आंदोलन करणा-या 27 आंदोलकांना सरकारने ताब्यात घेतले आहे. त्या ठिकाणी सरकारने 144 हे जमावबंदीचे कलम लावले आहे. सरकारच्या या निर्णयावर मुंबईतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारची ही दडपशाही असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

भाजप वगळता  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इतर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी शिवसेनेनंही या वृक्षतोडीला विरोध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वृक्षतोडीला आमचा विरोध असल्याचं म्हटलं आहे. तसंच आमचं सरकार आलं तर आरे जंगल जाहीर करु असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. मात्र शिवसेना सत्तेत असतानाही काही ठोस भूमिका घेत नाही त्यामुळे शिवसेनेचा विरोध हा केवळ दिखावा असल्याची टीका होत आहे.

आरेच्या शेजारी असलेल्या भागात शिवसेनेचे अनेक आमदार आहेत. मात्र एकानेही तिथे जाऊन आंदोलकांना पाठिंबा दिला नाही. आदित्य ठाकरे यांनी पुढंच सरकार येण्याची वाट पाहण्याऐवजी येत्या 21 तारखेला होणा-या विधानसभा निवडणुकीत आरेतील वृक्षतोडीला समर्थन करणा-यांन धडा शिकवावा अशी मागणी होत आहे. वृक्षतोडीचं समर्थन करणा-या पक्षाच्या उमेदवारांना मते देऊ नका असं प्रत्येक सभेत सांगा म्हणज्ये तुमचा विरोध करा आहे असं मुंबईकर मानतील.

तुमचं सरकार आल्यावर त्याला जंगल म्हणून जाहीर करु असं सांगता मग हे सध्याचं सरकार काय विरोधकांचं होतं काय ? तुमंच सरकारी येणार की नाही हे निकालानंतरच स्पष्ट होईल. पण तोपर्यंत आरेतील संपूर्ण झाडं तोडून होतील. बरं नवं सरकार आलं तर ते तुमचं ऐकेल हे कशावरुन ? तुम्ही जागाच लढवतायेत 124 त्यामुळे तुम्ही स्वबळावर तर सरकार स्थापन करणार नाहीत.  त्यामुळे आताच संधी आहे. वृक्षतोड करणा-यांन मते देऊ नका असं जाहीर सभांमधून सांगा म्हणज्ये मग मुंबईकर तुमच्यावर विश्वास ठेवतील.

आरेतील झाडे तोडल्यामुळे राग आला, वाईट वाटलं, असे भूंखड चोर आमच्या सरकारमध्ये नको आहेत, आरे म्हणज्ये पीओके असल्यासारखं कारवाई करण्यात आली आहे. असं आदित्यजी भरभरुन बोलले. एवढचं नाही तर आमचं सरकार आल्यावर अधिका-यांवर कारवाई करु असंही त्यांनी सांगितलं. असे अधिकारी आमच्या सरकारमध्ये नको असंही ते म्हणाले. आंदोलकांवर केलेल्या कारवाईबाबतीही त्यांनी तीव्र नापसंती दर्शविली. पण आरेमध्ये मेट्रोशेड करा असा निर्णय  काय अधिका-यांनी घेतला नव्हता. तुमच्या सरकारंच घेतला. मग त्यांना दोष देऊन उपोयग काय ? पण मग पुन्हा तोच प्रश्न झाडे तोडणा-यांना मते देऊ नका असं तुम्ही तुमच्या प्रचारसभेत म्हणा म्हणज्ये मुंबईकर तुमच्यावर विश्वास ठेवतील.

COMMENTS