नवजात बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज, माहिती मिळताच आदित्य ठाकरेंकडून मदतीचा हात!

नवजात बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज, माहिती मिळताच आदित्य ठाकरेंकडून मदतीचा हात!

मुंबई – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाचा खर्च टाळून आदित्य ठाकरे यांनी जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या अर्भकाला मदतीचा हात दिला आहे. नवजात बाळाच्या पित्याकडे एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली आहे. बाळाच्या वडिलांकडे उपचारासाठी पैसे नव्हते. युवासेना कार्यकर्त्याला याविषयी माहिती मिळाल्याने त्याने पित्याची व्यथा आदित्य ठाकरेंपर्यंत पोहोचवली. त्यानंतर लगेच आदित्य ठाकरे यांनी राहुल कनल आणि हुसैन शाह या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अब्दुल अंसारी यांच्याकडे एक लाखाची मदत सुपूर्द केली. तसेच यापुढे येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

दरम्यान घणसोलीमध्ये राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या नवजात बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज होते. मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सहा दिवसाच्या अर्भकाची जीवन-मृत्यूशी झुंज सुरु आहे. ऐरोलीच्या मनपा रुग्णालयात जन्मलेल्या बाळाच्या जीवाला जन्मापासूनच धोका असल्याचं सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. त्याला नेरुळच्या मंगल प्रभू रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याच्या प्रकृतीत काही सुधारणा न झाल्याने अब्दुल आपल्या मुलाला मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन आला. सध्या या बाळावर उपचार सुरु असून पित्याने आदित्य ठाकरे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

COMMENTS