यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा हा प्रकार होऊ देणार नाही – अदित्य ठाकरे

यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा हा प्रकार होऊ देणार नाही – अदित्य ठाकरे

नागपूर – सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हे मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरी आमच्यात एकमत आहे. त्यामुळे यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा हा प्रकार होऊ देणार नसल्याचा इशारा
शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत दिला. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

महाविकासआघाडीचं सरकार हे वचनपूर्ती करणारं सरकार आहे. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असला, तरी कॉमन मॅक्सिमम प्रोग्रेस हे ध्येय असल्याचंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. नोटबंदी आणि जीएसटीमुळे अनेक उद्योग बुडाले. मात्र, आमचं सरकार रोजगार निर्मितीसाठी पूर्ण प्रयत्न करेन याचा मला विश्वास आहे. “केजी टू पीजी” शिक्षण बदलले पाहिजे. त्यात नोकरीचीही हमी हवी. डिजिटल एज्युकेशन गावपातळीवर न्यावं लागणार असल्याचंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

COMMENTS