एबीव्हीपीचा विनोद तावडेंना घेराव !

एबीव्हीपीचा विनोद तावडेंना घेराव !

यवतमाळ –  भाजपच्या संघ परिवारातली असणा-या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच शिक्षणमंत्री विनोद तावडेंना घेराव घातला होता. यवतमाळमध्ये या कार्यकर्त्यांनी शनिवारी तावडेंचा ताफा अडवला होता. शिक्षण क्षेत्रात भोंगळ कारभार सुरु असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला असून याविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

शनिवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे यवतमाळच्या दौ-यावर होते. त्यादरम्यान या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंचा ताफा अडवला व त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिक्षण क्षेत्रात भोंगळ कारभार सुरु असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी त्यावेळी केला आहे. तसेच छत्रसंघ निवडणूक आणि सेमिस्टर पद्धतीचीही मागणी या कार्यकर्त्यांनी त्यावेळी केली आहे.  दरम्यान संघ परिवारातल्याच संघटनेनं भाजपविरोधात उतरुन जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत फूट दिसून येत आहे.

 

COMMENTS