शरद पवारांनी स्वामिनाथन आयोगातील एकही शिफारस का स्वीकारली नाही..? बच्चू कडू यांचा सवाल

शरद पवारांनी स्वामिनाथन आयोगातील एकही शिफारस का स्वीकारली नाही..? बच्चू कडू यांचा सवाल

बारामती – शेतक-यांची कर्जमाफी आणि शेतमालाला हमी भाव यासाठी आमदार बच्चू कडू यांची आसुड यात्रा सध्या सुरू आहे. ही यात्रा काल बारामतीमध्ये होती. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार, अजित पवार, काँग्रेस नेते, शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार आसुड ओढले. केंद्रात तब्बल १० वर्षे कृषी मंत्रालय सांभाळलेल्या शरद पवार यांनी स्वामिनाथन आयोगातील एकही शिफारस का स्वीकारली नाही असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय.. राज्यातील विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रा काढलीय.. मात्र तत्पूर्वी त्यांनी कान धरून उठाबशा काढून शेतकऱ्यांची माफी मागावी असा टोलाही त्यांनी लगावलाय.. विरोधकांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यास आपणही संघर्ष यात्रेत सहभागी होवू असंही आमदार कडू यांनी जाहीर केलंय.. सदाभाऊ खोत हे एकेकाळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणायचे, मात्र आता सत्तेत गेल्यानंतर त्यांच्याच डोळ्यातलं पाणी आटलंय.. त्यामुळं त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्यांसाठी लढा सुरु करावा असा सल्लाही आमदार कडू यांनी दिलाय.. त्याचवेळी सध्याचं सरकार शेतकरी जे मागणी करतात ते देत नाही.. शेतकऱ्यांचं काहीही भलं होणार नसल्याने हमीभाव हाच शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे वायफळ बडबड असल्याचं म्हटलंय.. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी दिशा बदलण्याचा हा खटाटोप असल्याचा आरोपही त्यांनी केलाय… बच्चू कडू नेमकं काय म्हणाले ऐकूया…..

COMMENTS