दानवेंच्या विरोधात विरोधी पक्षासह शिवसेनेचेही राज्यभरात आंदोलन

दानवेंच्या विरोधात विरोधी पक्षासह शिवसेनेचेही राज्यभरात आंदोलन

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील कार्यक्रमात शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषा वापरून केलेल्या व्यक्तव्यावरून राज्यभरातून  तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

नालासोपार्यात भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  चपलांचा हार घालून, दिली फाशी देत शेतकऱ्याच्या विरुद्ध दानवे यांनी अपशब्द वापरल्या मुळे शिवसेनेने आंदोलन करून निषेध व्यक्त केला. नालासोपारा शिवसेना मुख्य कार्यालयासमोर जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

शिवसेनेला सत्तेत भागीदारी करून घेणे भाजपाची मजबुरी आहे… शिवसेनेची नाही…त्याच्यात दम असेल तर शिवसेनेच्या मंत्र्याना बाहेर काढून दाखवावे असे शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यावेळी बोलले.

डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेने दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या फोटोची गाढवावरुन धिंड काढली. यावेळी शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे, तात्या माने यांच्यासहीत अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

धुळ्यात बेताल वक्तव्य करणा-या भाजप प्रदशाध्यक्ष रावसाहेब दाणवे यांच्या फोटोला शेण खाऊ घालून निषेध करण्यात आला. जिल्हा युवक काॅग्रेसने महाराणा प्रताप पुतळ्या जवळ आदोंलन करत दानवेच्या फोटोला शेण खाऊ घातले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजप आणि दानवेंचा निषेध करण्यात आला.

धुळ्यात शिवसेनेने दानवेच्या प्रतिमेला काळ फासुन निषेध करण्यात आला. यावेळी भाजप आणि दानवेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हिंगोलीत शिवसेनेकडून रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून दानवेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारून निषेध केला.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीने रावसाहेब दानवे यांचा निषेध करण्यात आला, दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जूते मारो आंदोलन यावेळी केले.

सातारा जिल्हा शिवसेनेच्यावतीने  रावसाहेब दाणवे यांचा निषेध करीत प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार व शिवसेनिकांनी कराड दत्त चौक येथे जोडो मारो आंदोलन केले.

सांगलीत रावसाहेब दानवे यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने करत रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळून निषेध केला,  शेतकऱ्यांच्या बद्दल बेताल व्यक्तव्य केला निषेध.

परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना आणि युवक संघटनेकडून रावसाहेब दानवेच्या वक्तव्याचा निषेध करत दानवेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.

शिर्डीत शिवसेनेने दानवेच्या प्रतिमेला चपला मारत निषेध नोंदवला यावेळी भाजपाने दानवेंची हलकालपट्टी करण्याची केली मागणी केली.

अकोल्यात रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेना आणि प्रहार रस्त्यावर उतले होते,यावेळी शिवसेनेने दानवेंच्या पुतळ्याला चपला मारल्या तर प्रहारने काळं फासलं, दानवे जर अकोल्यात आल्यास काळं फासू, असा इशारा शिवसेनेने दिला.

यवतमाळमध्ये शिवसेनेनं दानवेंच्या या विधानाचा निषेध केला. तसेच शेतकऱ्यांबद्दल चुकीच्या शब्दांचा वापर करणाऱ्या रावसाहेब दानवेंचीजीभ कापून आणणाऱ्याला यवतमाळ जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संतोष ढवले यांच्याकडून दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांना राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा आहे, त्यांच्या व्यक्तव्याचा विपर्यास करु नये, कार्यकर्ते यांना दानवे बोलले आहेत. या सरकारने शेतकरी यांच्यासाठी खुप चांगले निर्णय घेतले आहेत असे कॅबिनेट मंत्री मंत्री महादेव जानकर म्हणाले आहे.

यावर विखे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली, प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीने असं बोलणं दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या चुप्पीच आश्चर्य वाटतं आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे नाहीतर सरकार दानवेच्या मतांचे आहे असं वाटेल. अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केली.

 

 

 

COMMENTS