मनोधैर्य योजना, पीडितांना मिळणार 10 लाख रुपये – पंकजा मुंडे

मनोधैर्य योजना, पीडितांना मिळणार 10 लाख रुपये – पंकजा मुंडे

मुंबई – मनोधैर्य योजनेतील पीडितांना मिळणा-या मदतीमध्ये सरकारने वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 3 हजार रुपये मिळत असत ते वाढवून आता 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बालकांवरील लैंगिक अत्याचार, असिड हल्ला अशा सारख्या घटनांमधील पीडितांना या योजनेतून मदत दिली जाते. 10 लाख रुपयांपैकी 25 टक्के रक्कम रोख दिली जाणार आहे. तर उर्वरीत 75 टक्के रक्कम एफडीमध्ये टाकली जाणार असून त्याचे व्याज पीडितांना मिळणार आहे. या सुधारीत योजनेमध्ये 2009 पासूनच्या पीडितांचा समावेश केला जाणार आहे.

COMMENTS