नारायण राणे – देवेंद्र फडणवीस अहमदाबादेत एकाच गाडीत !

नारायण राणे – देवेंद्र फडणवीस अहमदाबादेत एकाच गाडीत !

अहमदाबाद – काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी मुख्यमंत्री नारयण राणे यांच्या अहमदाबाद दौ-यावरुन राजकीय वर्तुळात राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झालीय. राणेंनी आपण खाजगी कामासाठी अहमदाबादला गेल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करत असल्याचे व्हिज्युअल्स एबीपी माझाने दाखवले आहेत. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहे. राणेंची अमित शहा यांची भेट झाली की नाही याबाबत अजुन स्पष्टता झाली नाही. तरी फडणवीस आणि राणे एकाच गाडीतून प्रवास करत असल्यामुळे फडणवीसांनी राणेंना अमित शहांच्या भेटीला घेऊन गेल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झालीय. दरम्यान आज दुपारी राणे सिंधुदुर्गात दाखल होत आहेत.

COMMENTS