देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावी रमले शरद पवार आणि कुटुंबीय

देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावी रमले शरद पवार आणि कुटुंबीय

देशातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिलारला मान मिळाला आहे. गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी भाषेच्या पुस्तकांच्या गावचे उद्धाघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर दुस-याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी भिलार गावाला भेट देऊन पुस्तकाच्या गावची पाहणी केली. भिलार गावातील घरा – घरा मध्ये दिवाणखाण्यात सजऊन ठेवलेली पुस्तके शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी चाळली. त्यांच्या समवेत वाईचे आमदार मकरंद पाटील ,  श्रीमती सुनेत्रा पवार, त्यांची पुतणी रजनी इंदूरकर, विजयाताई पाटील, रयत शिक्षण संस्थेचे डॉ अनिल पाटील, शरद पवार यांच्या पुतण्याची पत्नी जर्मनीचे निकोला,  असे कुटूंबिय आज भिलार गावात पुस्तकांचे गाव पहाण्यासाठी आले होते.  पुस्तकांचे गाव पाहिल्यानंतर पवार कुटुंबियांनी महाबळेश्वर चा गावरान मेवा हि चखला स्टोबेरी,  रोजबेरी,  तुतु,  मका पॅटीस आदींचाही आस्वास घेतला.

COMMENTS