‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’

‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’

पुणे  – पुणे उपहासात्मक पाट्यासाठी प्रसिद्ध आहे आता आणखी एक नवा फलक झळकला आहे. मात्र, या नव्या फलकामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ असे शीर्षक देऊन एक फलक सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याबद्दल हे फलक लावण्यात आले आहे.

‘तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार’ असे शीर्षक देऊन त्यांना पुण्यातून परत सांगलीला जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तुम्ही पक्ष संपवण्याची शपथ घेतली होती. ती आता पूर्ण झाली, असा टोला या फलकातून लगावला आहे. फलकाच्या खाली काही व्यक्तींची नावे लिहिण्यात आली आहेत. असे फलक अनेक ठिकाणी लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आजच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येते.

 

COMMENTS